Hot Widget

Breaking

मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०२१

Whats app कामाच्या ट्रिक्स बना / Quick whatsapp messages master.

Whats App च्या कमाल ट्रिक्स, स्वतः बना 'मेसेजिंग मास्टर'

चॅटिंग साठी व्हाट्स App चा वापर तुम्ही करत असाल परंतु, यात मिळणाऱ्या खूप साऱ्या फीचर्स संदर्भात तुम्हाल कमीच माहिती असेल. व्हॉट्सअपमध्ये युजर्संच्या गरजा समजून कंपनीने खूप सारे फीचर्स दिले आहेत. तसेच कंपनी लागोपाठ नवीन फीचर्स व्हॉट्सअपमध्ये ऍड  करीत आहे. व्हॉट्सअपमध्ये काही साधे फीचर्स आणि ट्रिक्स आहेत. या ट्रिक्सचा वापर केल्यास तुम्हाला खूप काही गोष्टी सोप्या वाटतील. व्हॉट्सअपमध्ये मिळणाऱ्या या ट्रिक्सचा वापर तुम्ही केला तर तुम्ही स्वतः मेसेजिंग मास्टर बनाल. तसेच व्हॉट्सअप कंपनीने दिलेल्या सर्वच्या सर्व ट्रिक्सचा वापर तुम्ही करु शकता. एकदा व्हॉट्सअपच्या या ट्रिक्सवर नजर टाकून त्याचा वापर करायला सुरुवात करा. या ट्रिक्समुळे तुमची चॅटिंगची मजा दुप्पट तर होईल परंतु, तुम्ही व्हॉट्सअपमधी चॅटिंग मास्तर नक्की बनाल पाहा या ट्रिक्स काय आहेत.




आलेला टेक्स्ट मेसेज ऐका***

व्हॉट्सअप चॅटिंग म्हणजेच मेसेज करण्यासाठी ओळखला जातो. दिवसभरात लाखो युजर्स चॅटिंगची मजा घेत असतात. काही जण तर रात्र दिवस चॅटिंगमध्ये व्यस्त असतात. अनेकांना चॅटिंग करताना मेसेज टाईप करताना अडचण पण येते. परंतु, व्हॉट्सअपवर मेसेज आल्यास आणि तुम्हाला तो मेसेज हात न लावता तुम्ही तो ऐकू शकता. अशी व्हॉट्सअपमध्ये सुविधा देण्यात आली आहे. Siri असिस्टेंटच्या मदतीने तुम्ही टेक्स्ट मेसेज त्याच्या मदतीने ऐकू शकता. परंतु, हे फीचर केवळ अँड्रॉयड डिव्हाईसेसवर गुगल असिस्टेंटमध्ये मिळत नाही.


​फोटोवर ऍड केलेले इमोजी किंवा बनवलेले ड्रॉईंग***



व्हॉट्सअपव सर्वात जास्त मेसेज फॉरवर्ड केले जातात. एका ग्रुपमधून दुसऱ्या ग्रुपवर मेसेज फॉरवर्ड करायला काही सेकंदाचा कालावधी लागतो. काही जण तर आलेला मेसेज जशाच्या तसाच फॉरवर्ड करत सुटतात. यातून अनेक वेळा फेक न्यूज सुद्धा असतात. त्याची खातरजमा न करताच तो मेसेज फॉरवर्ड केले जातात. व्हॉट्सअपमध्ये कोणताही फोटे सेंड करायचा असेल तर त्याआधी त्यावर ड्रॉईंग करण्यासाठी खूप सारे पर्याय आहेत तसेच खूप इमोजी अड करण्याचे पर्याय आहेत. तुम्ही केवळ अटॅच आयकॉनवर टॅप केल्यानंतर फोटोला सिलेक्ट करा. आता तुम्हाला फोटो क्रॉप करण्यापासून त्यावर ड्रॉईंग करण्यापर्यंतचे ऑप्शन मिळतील.


​बोला आणि मेसेज पाठवा***

जर तुम्हाला व्हॉट्सअपवर चॅटिंग करुन कंटाळा आला असेल. तुम्हाला आता टाईप करायचे नसेल तर तुम्ही केवळ बोलूनही मेसेज पाठवू शकता. व्हॉट्सअपने ही सुद्धा सुविधा तुम्हाला दिली आहे. स्मार्टफोनमध्ये व्हॉईस असिस्टेंट असेल तर तुम्ही फक्त बोलून मेसेज पाठवू शकता. विना फोनला हात लावता टेक्स्ट मेसेज Siri किंवा Google Assistant च्या मदतीने हे करता येऊ शकते. तुम्हाला Hey Siri/Google म्हटल्यानंतर कमांड दिली जाते. त्यानंतर Send whats app message to कॉन्टॅक्टचे नाव. त्यानंतर असिस्टेंट तुम्हाला तुमचा मेसेज विचारेल. आणि कन्फर्म झाल्यानंतर तो मेसेज पाठवण्यात येईल.

​मेसेज वाचून पुन्हा अनरिड करा***

जर तुम्हाला कोणाचा तरी मेसेज वाचायचा परंतु, त्याला रिप्लाय लगेच द्यायचा नाही. नंतर फुरसत मध्ये त्याला रिप्लाय करायचा आहे. अशावेळी व्हॉट्सअपने एक जबरदस्त ट्रिक्स सुविधा तुम्हाला दिली आहे. मेसेज वाचा परंतु, रिप्लाय नंतर द्या. मेसेज वाचल्यानंतर तो मेसेज अनरिड केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला त्या युजरच्या नावावर लाँग टॅप करावे लागेल. ज्याचा मेसेज तु्म्हाला अनरिड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हे ऑप्शन मिळेल. त्यानंतर तुम्ही ठरवा त्याच्या मेसेजला रिप्लाय कधी करायचा आहे


​ग्रुप चॅट्समध्ये कंट्रोल करा प्रायव्हसी***

जर तुम्ही कोणत्याही ग्रुपमध्ये अड असाल किंवा त्या ग्रुपमधील जास्त मेंबर्स तुमच्या परिचयाचे नसतील ते तुम्हाला ओळखत नसतील. तर अशा ग्रुप्सना कंट्रोल करण्याचा ऑप्शन यात दिला आहे. तुम्हाला तुमचे व्हॉट्सअप ओपन करायचे आहे. त्यानंतर सेटिंग्समध्ये जाऊन अकाउंटच्या प्रायव्हसीमध्ये जायचे आहे. त्यानंतर तुम्ही तुमची प्रोफाईल फोटो आणि स्टेट्स त्या लोकांपासून लपवू शकता. जे तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नाहीत. त्यामुळे तुमच्या अकाउंटवर असलेला फोटो कुणीही पाहणार नाही. किंवा तुम्ही ठेवलेले स्टेट्स सुद्धा कुणी पाहणार नाही.


​कुणी कधी वाचला तुमचा मेसेज***

तुम्ही ग्रुपमध्ये किंवा पर्सनल चॅटवर कोणताही मेसेज पाठवला तो मेसेज कुणी किती वेळात पाहिला किंवा वाचला आहे. ग्रुपमधील कोणी कधी तुमचा मेसेज वाचला हे चेक करता येऊ शकते. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मेसेजवर लाँग टॅप करावे लागेल. त्यानंतर टॉप अप राईट कॉर्नरवर कुणी कुणी मेसेज वाचला हे दिसेल. कोणत्या व्यक्तीने किती मिनिटांनंतर तुमचा मेसेज वाचला आहे. याची यादी तुम्हाला दिसेल. वाचणाऱ्या युजर्संचे नाव आणि त्याने तो मेसेज कधी वाचला याची वेळ तुम्हाला दिसेल.


​​एकाचवेळी अनेकांना पाठवा मेसेज***

जर तुम्हाला एक मेसेज अनेकांना पाठवायचा आहे. तर तुम्हाला एक - एक करुन चॅटबॉक्समध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमचा अप ओपन करा. त्यानंतर टॉप राईट कॉर्नरवर दिसत असलेल्या तीन डॉट्सवर टॅप करा. त्यानंतर ब्रॉडकास्ट ऑप्शन निवडा. त्यानंतर ज्यांना मेसेज पाठवायचा आहे. त्यांना सिलेक्ट करा. तसेच ब्रॉडकॉस्ट लिस्ट तयार करुन तुम्ही तो मेसेज एकाचवेळी पाठवू शकता. सर्व लोकांना पर्सनल चॅट मध्ये मेसेज रिसिव्ह होईल. त्यामुळे व्हॉट्सअपची ही सुविधा सुद्धा तुम्हाला चॅटिंग मास्टर बनवण्यास मदत करेल.


नोटिफिकेशनने लपवा चॅट***

स्मार्टफोन्सची लॉक स्क्रीनवर सुद्धा व्हॉट्सअप मेसेज नोटिफिकेशन प्रमाणे दिसते. तसेच विना फोन अनलॉक करताही ते पाहता येऊ शकते. जर तुम्हाला वाटतेय की, व्हॉट्सअप मेसेज आल्यानंतर फोनचा डिस्प्ले ऑन झाला पाहिजे. आणि बाकीचे नोटिफिकेशन वर मेसेज दिसत असेल तर अपच्या सेटिंग्समध्ये नोटीफिकेशन आणि Show Preview मध्ये जाऊन याला लपवू शकता. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा मिळू शकतो. व्हॉट्सअप एका पेक्षा एक अशा जबरदस्त ट्रिक्स आपल्या युजर्संसाठी आणल्या आहेत.


ताज्या अपडेट राहण्यासाठी लाइक करा. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: