साप चावल्यावर इस्पितळात जाईपर्यंत कोणती
दक्षता घेणे आवश्यक असते?
मला वाटतं या प्रश्नाचे मी छान उत्तर देऊ शकेन…कारण मी एक सर्पमित्र आहे…
सर्वप्रथम अगोदर थोडीशी सापाबद्दल माहिती करून घेऊ..
साप दोन प्रकारचे असतात…एक विषारी उदा. नाग,मण्यार फुरस,घोणस, आणि दुसरा बिनविषारी उदा.धामण,दिवड, पाण्याळी (वेरुला) ई.….
बिनविषारी साप जर चावला तर घाबरायचे नाही त्यामुळे तुमच्या जीवाला धोका नाही…डॉ.कडे जाऊन मलमपट्टी करून घ्यावी…आणि विषारी साप चावला तरीपण घाबरायचे नाही…मानसिक संतुलन ढासळू द्यायचे नाही..शांत राहायचे…कारण साप चावल्या नंतर लगेच काही होत नाही….
पण साप चावल्यावर आपण घाबरतो आणि आपले बिपी वाढते….त्यामुळे सापाचे विष जलदगतीने शरीरभर लवकर पोहचते..म्हणून शांत राहणे आणि एका तासाच्या आत डॉ.कडे जाणे.(खास करून मोठी सरकारी हॉस्पिटल किंवा मोठ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये) गावातल्या इतर डॉ.कडे जाऊन वेळ वाया घालवू नये…
सापाने चावल्यावर ओळखायचे कसे की तो साप विषारी की बिनविषारी…
वरील फोटोत साप चावल्यानंतर शरीरावर होणाऱ्या जखमा यांची चित्रे पाहायला मिळतात..त्यावरून साप कोणता चावला हे ओळखता येते…कोणत्याही विषारी सापाने चावले तरी फोटोत दाखविले आहे तशीच खूण होते..
आता महत्वाचा प्रश्न विषारी साप चावल्यावर करायचे काय…
१) वर म्हटल्याप्रमाणे घाबरायचे नाही..
२)जिथे साप चावला असेल तर ती जखम सोडून त्या जखमेच्या वरती दोरीने घट्ट बांधावे..
३)जिथे साप चावला असेल त्या ठिकाणी नवीन ब्लेड ने कापावे…जेणेकरून त्या जखमेतून रक्त बाहेर पडेल आणि blood Circulation ने विष कमी शरीरात जाईल..
४)प्रत्येक सापाचा विषावर वेगवेगळी प्रतिजैविके असतात त्यामुळे कोणता विषारी साप चावला त्या सापाच वर्णन डॉ.ना सांगा, जेणेकरून इलाज अचूक केला जाईल…
शेवटी साप हा सर्वात भित्रा प्राणी आहे..घाबरून तो चावतो..शेतकऱ्याचा तो मित्र आहे म्हणून प्लीज सापांना मारू नका..घराजवळ साप आला तर सर्पमित्रांना बोलवा
please Save Snake
धन्यवाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा