Ad Code

Responsive Advertisement

I Why is it that Indra Dev is not worshiped and Indra Deva Temple is not visible anywhere? /

इंद्रदेवाची पुजा होत नाही आणि इंद्रदेवाच मंदिर पण कुठेच दिसत नाही असं का?

जरी इंद्रदेवाचे मंदिर बांधले जात नसले किंवा मूर्तिपूजा केली जात नसली, तरी यज्ञामध्ये त्याला मानाचे स्थान देण्यात आले आहे. प्रत्येक यज्ञाची सुरुवात आणि शेवट हा इंद्राला तूप अर्पण करूनच केला जातो.


वैदिक कालखंडामध्ये इंद्र हा सगळ्यात प्रसिद्ध देव होता. ऋग्वेदात एकूण १,२०८ सूक्ते आहेत त्यापैकी २५% हुन जास्त सूक्तांमध्ये इंद्र देवाचे वर्णन करण्यात आले आहे. पण नंतरच्या काळामध्ये लोक तंत्र आणि पुराणांकडे वळू लागले. हळू हळू इंद्राची जागा शंकर, विष्णू, ब्रह्मदेव तसेच वेगवेगळ्या देवीदेवतांनी घेतली आणि त्याच्या प्रसिद्धीमध्ये घट होऊ लागली. म्हणजेच ह्याचाच अर्थ असा होतो कि वैदिक काळामध्ये खूप प्रसिद्ध असणाऱ्या इंद्राच्या प्रसिद्धीला पुराण काळामध्ये उतरती कळा लागली.

जरी इंद्रदेवाचे मंदिर बांधले जात नसले किंवा मूर्तिपूजा केली जात नसली, तरी यज्ञामध्ये त्याला मानाचे स्थान देण्यात आले आहे. प्रत्येक यज्ञाची सुरुवात आणि शेवट हा इंद्राला तूप अर्पण करूनच केला जातो.

असं पण म्हटलं जात कि इंद्र हे कुठल्याही देवाचे नाव नव्हते तर ते एक पद होते. मन्वंतरामध्ये आपल्याला एकापेक्षा जास्त इंद्र, सप्तर्षी, अंश्वतारा आणि मनु असल्याचे आढळून येतात. १४ मन्वंतरांमध्ये १४ वेगवेगळे इंद्र होते - यज्ञ, विपश्यित, शीबी, विधु, मनोजव, पुरंदर, बाली, अदभुत, शांती, विश, रीतुधाम, देवस्पती आणि सुची.


मनुष्यप्राण्याप्रमाणेच इंद्रदेवामध्ये पण भावना, इच्छा, असुरक्षितता असे काही मानवीय गुण (अवगुण) होते. त्याला स्वर्गलोक अत्यंत प्रिय होता आणि तो सोडायची त्याची अजिबात इच्छा नसायची. आपले आसन अबाधित ठेवण्यासाठी तो कायम प्रयत्नशील असायचा. ह्याच प्रयत्नात तो अनेकदा ऋषीमुनींची यज्ञे, राक्षसांची तपश्चर्या, पृथ्वीलोकातील राजांच्या पूजा ह्यामध्ये नानाविध विघ्ने आणायचा. इंद्र देवाची पूजा न करण्यामागे हे पण एक महत्वाचे कारण असू शकते.

त्याशिवाय वैदिक कालखंडामध्ये मंदिर बांधणे हा प्रकार मुळात अस्तित्वातच नव्हता तर त्या ऐवजी यज्ञ करण्यावर भर दिला जायचा. त्यामुळे इंद्र देवाची मंदिरे बांधली गेली नाहीत आणि पुढल्या काळात जास्त पूजा पण केली गेली नाही.

असे जरी असले तरी खूप वर्षांपूर्वी उत्तर भारतामध्ये 'इंद्रोत्सव' नावाचा सण साजरा केला जायचा. पण हळू हळू कृष्ण आणि राम ह्या देवांचा प्रभाव वाढत गेल्याने त्याची जागा गोकुळाष्टमी, होळी, रंगपंचमी ह्यांसारख्या सणांनी घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या