Hot Widget

Breaking

रविवार, १४ मार्च, २०२१

सुटलेले पोट कमी करण्यासाठी काय काय करायला पाहिजे?/ What to do to reduce the escaped stomach?

 सुटलेले पोट कमी करण्यासाठी काय काय करायला पाहिजे.

ज्या व्यक्तींना ही समस्या आहे त्यांना मी अशी खात्री देते की हे उत्तर पूर्ण वाचलं आणि ते आमलात आणलत तर पुढच्या 3 महिन्यात पोटाचा घेर कमी झालेला दिसेल..

ह्यासाठी पुढील अवघड गोष्टींचा हट्ट असणार नाही

१. ह्यासाठी मी तुम्हाला कुठलाही भयानक हात पाय अंग दुखाणारा व्यायाम करायला सांगणार नाही..(एका उत्तरात मी सांगितला आहे, पण तेव्हा मला माहित नव्हता 

२. कोणताही पदार्थ जेवणातून न खाण्याचा सल्ला देणार नाही.. (फक्त जेवणात जास्त प्रमाणात गोड खाणं कमी करावे लागेल उदारणार्थ १० गुलाबजाम खात असाल तर ३-४ वर या)

३. हा डाएट प्लॅन आयुष्यभर तुम्ही आनंदाने सुरू ठेऊ शकता.. ३ महिने झाले की वजन कमी झालेले असेल (ओव्हर वेट असाल तरच! आणि फक्त बॅड फॅट्स कमी होतील मसल्स नाही) तेव्हा कंटाळून तुम्ही 'सुटलो बाबा एकदाचे' म्हणून हा डाएट प्लॅन सोडणार नाहीत..

तर आता वरील गोष्टी वाचून तुम्हाला आनंद झाला असेल आणि हा डाएट प्लॅन काय आहे ह्याची उत्सुकता निर्माण झाली असेल पण त्याआधी मी तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे देणार आहे.. जसे की साधारण तिशी नंतर पोट का सुटते?, बरीच लोक दूध, तूप, मलई, गोड हे सगळं चरबी वाढवणारे पदार्थ खात नाहीत तरीही त्यांचे वजन का वाढते? पोट का सुटते?, आता सर्वात मोठा प्रश्न बरेच लोक अगदी अनेक वर्षांपासून एकही दिवस न चुकता व्यायाम करतात जसे की ३-४ किलोमीटर रोजचे जोरात चालणे किंवा स्वीमिंग वगैरे तरीही त्यांचे पोट का सुटते? माझ्या एका मैत्रिणीचे वडील गेल्या चाळीस वर्षांपासून न चुकता रोज भरभर १ ते १.५ तास चालतात तरीही त्यांना कमालीचे पोट आहे.. (आता त्यांनी हा डाएट प्लॅन सुरू केला आहे)

तर ह्या सगळ्या प्रश्नावर एकच उत्तर आहे ते म्हणजे शरीरामध्ये वाढलेले 'इन्सुलिन' ह्या संप्रेरकाचे प्रमाण..

होय! जास्तीचे इन्सुलिन हे सम्प्रेरक शरीरात अतिरिक्त चरबी वाढवण्याचे काम करते.. त्याचबरोबर अतिरिक्त इन्सुलिनचे अजूनही बरेचसे दुष्परिणाम होतात.. जसे की डायबेटीस, हृदय विकार..

इन्सुलिन हे शरीरामध्ये अतिरिक्त वाढण्याचे कारण काय आहे?

इन्सुलिन दोन प्रकारे शरीरात निर्माण होते?

पहाटेची सकाळची ताकत किती असते./What is the strength of the morning

१. शरीरामध्ये दिवसभरात नैसर्गिकरित्या एक विशिष्ट प्रमाणात इन्सुलिन तयार होत असते. ३० ते ३२ युनिट.. हे आपल्याला जिवंत राहण्यासाठी गरजेचे असते. ते आपण कमी करू शकत नाही.

२. जेव्हा आपण दिवसभरात काहीही खातो किंवा पितो (फक्त पाणी सोडून) तेव्हा इन्सुलिन तयार होते. आता हा जो दुसरा मार्ग आहे, त्या मार्गाने आपण दिवभरात खूप इन्सुलिन तयार करतो. प्रत्येकाचे काहीतरी खाल्यानंतर इन्सुलिन तयार होण्याचे एक माप असते.. जसे की माझी हाताची ओंजळ छोटी असेल तर कमी शेंगादाणे मावतील, एखाद्याच्या हातात जास्त दाणे मावतील. अगदी तसच प्रत्येकाचे इन्सुलिनचे माप वेगळे असते. उदाहरणार्थ सकाळी दूध साखर युक्त चहा घेतला की एक माप पडलं.. एखाद्याच ते २ युनिट असेल किंवा ५ किंवा अगदी १० सुद्धा असेल. व्यक्तिपरत्वे वेगवेगळं असत.. तर अश्या प्रकारे आपण दिवसभरात जे पण काही खातो (थोडं किंवा जास्त) त्याने इन्सुलिनचे एक माप पडत जाते.. अश्या प्रकारे दिवसभरात सतत काहीतरी खात राहून आपण इन्सुलिनचे प्रमाण आपण वाढवत नेतो..म्हणून अशी उलटी उदाहरणे पण दिसतात की कमी खाणाऱ्या लोकांचे पोट जास्त खाणाऱ्या लोकांपेक्षा जास्त असते. ह्याचे कारण इन्सुलिनचे एखाद्याचे मापच नैसर्गिकरित्या जास्त असते..

वाढलेले इन्सुलिन शरीराला कश्या प्रकारे इजा पोहोचवते? आपल्या शरीराला जी ऊर्जा लागते ती ऊर्जा शरीर तीन प्रकारांनी मिळवते.

१.ग्लुकोज     २. यकृतामध्ये (लिव्हरमध्ये) साठवलेले ग्लायकोजन    ३.चरबी जाळून मिळणारी ऊर्जा..

ह्या ३ सोर्स ने शरीर ऊर्जा निर्माण करते.. सर्वात पहिले आपल्या शरीरातल्या पेशी रक्तातल्या ग्लुकोज पासून ऊर्जा मिळवतात..ग्लुकोज वापरून झालं की लिव्हरमधील ऊर्जा वापरली जाते.. हे दोनीही संपलं की मग चरबीला हाथ लागतो.. इन्सुलिनमुळे शरीर ग्लुकोज वापरते..

विश्वास ठेवा आपल्या शरीरातल्या पेशींना ऊर्जा निर्माण करण्यासाठी चरबी जाळायलाच खूप आवडते, कारण चरबीपासून त्यांना ९ कॅलरी ऊर्जा मिळते आणि एका ग्लुकोजपासून त्यांना फक्त ४ कॅलरी ऊर्जा मिळते..

पण शरीरात इन्सुलिनचे वाढलेले प्रमाण शरीराला जास्तीत जास्त ग्लुकोजच वापरायला सांगते त्यामुळे चरबीला हातच लागत नाही.. आणि आपण सतत अश्या प्रकारे सतत काहींना काही तोंडात टाकत राहून वर्षोनुवर्षे इन्सुलिनचे प्रमाण वाढवत राहिलो की आपल्या शरीरातल्या पेशींना राग यायला लागतो.. ते इन्सुलिन नावाच्या पाहुण्याला कंटाळून जातात.. आणि इन्सुलिन बाबत सेन्सिटिव्ह होणं कमी करतात.. स्वतःवर एक कुलूप लावून घेतात त्यामुळे इन्सुलिनला ते कुलूप उघडता येत नाही आणि पेशी ग्लुकोज वापरणं कमी करतात आणि रक्तात साखरेचे प्रमाण वाढायला लागते.. आणि मधुमेह होतो.. तर मधुमेह (type 2 डायबेटीस) चे कारण हे शरीरात अवास्तव वाढलेले इन्सुलिनचे प्रमाण हे आहे..हे अनेक रिसर्च पेपरद्वारे सिद्ध झालेले आहे..

साधारण तिशीपर्यंत बऱ्याच जणांचे पोट का सुटते?

२४ ते २५ व्या वर्षापर्यंत मुलगा आणि मुलींमध्ये काही इतर हार्मोन्स रक्तात धावत असतात त्यामुळे चरबी वाढत नाही. उदाहरणार्थ मुलांमधील टेस्टोस्टेरॉन.. मुलींमध्ये पण एक हार्मोन असते ज्याचे नाव लक्षात नाही.. वयपरत्वे ह्याचे प्रमाण कमी होते म्हणून इन्सुलिन वाढले की चरबी वाढायला लागते..

आता तुम्हाला लक्षात आलं असेल की दूध तूप गोड जास्त न खाता, आणि बऱ्यापैकी व्यायाम करून सुद्धा पोट का सुटते.. इन्सुलिनचे वाढलेले प्रमाण पोळी, भातामधील ग्लुकोजच वापरून आपल्याला जाड करत राहते.. बरेच जण पिझ्झा बर्गर वर्षोनुवर्षे खात नाहीत. फक्त पोळी, भाजी, भात, वरण खाऊन वजन अवास्तव वढवतात त्याला कारण हे एकच आहे..

इन्सुलिन कसे काम करते?

आपण काहीही खाल्ले अगदी एक शेंगदाणा जरी तोंडात टाकला तरी इन्सुलिनचे एक माप पडते.. एखाद्याचे २ युनिट, एखाद्याचे ५ युनिट, एखाद्याचे १० युनिट.. आता एकदा माप पडले की पुढील ५५ मिनिटे काहीही खाल्लं तरी दुसरं माप पडत नाही.. उदारणार्थ तुम्ही एक शेंगदाणा खाल्ला आणि ५५ मिनिटाच्या आत पोटभर जेवलात तरीही इन्सुलिनचे दुसरे माप पडत नाही.. ५५ मिनिटांच्या पुढे तुम्ही परत काही खाल्ले तरच नवीन माप पडते..

फायनली काय आहे डाएट प्लॅन?

डाएट प्लॅन आहे दिवसातून फक्त २ च वेळा जेवायचं.. जेव्हा भूक लागेल त्या २ वेळात पोटभर जेवायचे आणि जेवण हे ५५ मिनिटांच्या आत संपले पाहिजे.. 55 मिनिटाच्या पुढे पाण्याशिवाय काहीही तोंडात टाकायचे नाही.. कडकडीत भुकेच्या २ वेळा ओळखायच्या त्या वेळात पोटभर जेवायचे.. ५५ मिनिटात जेवण उरकायचे..दोन जेवणाच्या मध्ये काहीही खायचं प्यायचं नाही.. पाणी सोडून..सकाळचा चहा आणि नाश्ता सोडावा लागेल.. सकाळी भूक लागत असेल तर सरळ जेऊन घ्या.. जेवण झालं की ५५ मिनिटांच्या आत चहा पिला तर चालेल..प्रिय भगिनींनो भाजी करताना मीठ बरोबर आहे की नाही चाखून पाहता येणार नाही.. अंदाजेच स्वयंपाक करावा लागेल शेंगदाणे भाजताना उगाच तोंडात एखादा टाकता येणार नाही..

व्यायाम एक साधा सोप्पा करावा लागेलच. कारण आपल्याला अतिरिक्त चरबी कमी करायची आहे. त्यासाठी शरीराला व्यायाम देऊन चरबीपर्यन्त पोहोचायला भाग पडायचे आहे.. दिवसातून फक्त २ वेळा जेऊन आपण इन्सुलिनचे वाढलेले प्रमाण कमी केले आहे असे समजुया.. त्यामुळे ग्लुकोज फार न वाढवून आपोआप चरबीपर्यंत पेशी ऊर्जा घ्यायला जातील..आणि चरबी जळायला सुरुवात होईल..तर व्यायाम आहे फक्त ४५ मिनिटे भरभर चालणे.. सकाळीच चालायला पाहिजे असं काही नाही संध्याकाळी पण करू शकतात.. जास्तीत जास्त ४.५ किलोमीटर अंतर पार करण्याचा प्रयत्न करावा..

ह्या डाईट प्लॅनच्या भरपूर success stories तुम्हाला नेट वर मिळतील.. डॉक्टर दीक्षित डाएट प्लॅन म्हणतात ह्याला.. माझ्या मैत्रिणीने २ महिन्यात ४ किलो वजन कमी केले.. फार व्यायाम फॉलो करत नाही.. जेवणात तस बरच गोड खाते.. फक्त २ वेळाच जेवण करते आणि अधे मध्ये फक्त पाणी पिते..

हा एकमेव असा डाएट प्लॅन आहे ज्यात पाहिले पोटाची चरबी कमी होते.. विश्वास नसेल तर करून बघा..

डॉक्टर दीक्षित यांचा विडिओ युट्युबवर आहे त्याची लिंक खाली देते.. हे एवढं मोठं उत्तर ज्यांना दिड तासांचा विडिओ बघायचा कंटाळा येतो त्यांच्यासाठी लिहलय.. पूर्ण माहितीसाठी त्यांचा विडिओ पूर्ण बघा..

HBA1C ही रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण मोजण्याची टेस्ट डॉक्टर दीक्षितांमुळे फेमस झाली.. ज्यांचं HBA1C हे ६ च्या पुढे जाईल ते भविष्यात मधुमेहाचे रुग्ण होणार.. पण घाबरू नका हा डायट प्लॅन फॉलो करून खूप जण त्यापासून बचावले आहेत.. अनेक जणांना तर १० वर्षांपासून असणारा मधुमेह पण ह्याने बरा झाल्याचे उदाहरणं त्यांनी सांगितले पण अर्थातच मधुमेहींनी डॉक्टरच्या देखरेखीखाली हा डायट प्लॅन करावा..

 हे उत्तर पूर्णपणे डॉक्टर दीक्षित ह्यांच्या व्याख्यान ऐकून माझ्या शब्दात लिहले आहे.. त्यांचे अनेक रिसर्च पेपर प्रसिद्ध झाले आहेत.. त्यांच्या आधी सुद्धा डॉक्टर श्रीकांत जिचकर ह्यांनी हा डाएट प्लॅन सांगितलेला आहे.. अमेरिकेत ह्यावर अनेक रिसर्च पेपर प्रसिद्ध झाले आहेत.. तिथे ह्याला intermidiate fasting असे म्हणतात.

तर लक्षात ठेवा सुटलेले पोट तुम्हाला सांगत आहे की तुमच्या शरीरात इन्सुलिन ह्या सम्प्रेरकाचे प्रमाण जास्त झाले आहे.. वेळीच डाएट प्लॅन म्हणजेच ही जीवनपद्धती आमलात आणा.. आयुर्वेदातही लिहले आहे द्विकाल भुंजते म्हणजे फक्त २ वेळा जेवा..

"एक वेळा जेवतो तो योगी, २ वेळा जेवतो तो भोगी आणि ३ वेळा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा जो जेवतो तो रोगी"- भारतीय आयुर्वेद मी ऐकलेले २ अध्यात्मिक संत एक म्हणजे गौतम बुद्ध आणि एक आत्ता हयात असलेले सदगुरु हे सुद्धा दिवसातून फक्त २ वेळा जेवण्याला एक उत्तम जीवन पद्धत मानतात. सदगुरूंच्या म्हणण्यानुसार ह्या जीवनशैलीने ६ आठवड्यात अनेक रोग गायब होतात .. हा त्यांचा फक्त ३ मिनिटांचा व्हिडिओही नक्की पहा.. उत्तराबद्दल 

                                                                 ooooooooooooooo

आमचा पुढील ब्लॉग  -  Click  https://mapart01.blogspot.com/2020/03/mapart-history-banana.html

माज्या ब्लॉग मधील लेख हा व्हाटस अप्प वरुन घेतला आहे. कुणाचे मन दुखवायचे नसून माहिती तुमच्या पर्यत पोहचवण्याचे उदेश आहे. तुमला हा लेख कसा वाटला कमेंट मधुन जरूर कळवा तुमचा आपला https://Maparthistory01blogspot.com धन्यवाद 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: