Hot Widget

Breaking

शनिवार, २७ मार्च, २०२१

होळी का साजरी केली जाते I Why Holi is celebrated


होळी का साजरी केली जाते. काही लोकांना अजून माहीत नाही 


होळी चा सण म्हणून रंगाचा सण म्हणून ओळखला जात असला तरीही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे वेगवेगळे महत्व आहे, काही ठिकाणी ह्याच सणाला शिमगा ही बोलले जाते. आणि त्याचे वेगळेच महत्व असते.  
 


राक्षसकुळात हिरण्यकश्यपू नावाचा एक राक्षस होता. तो स्वत:ला सर्व श्रेष्ठ समजायचा. देवतांविषयी त्याला त्याचा मनामध्ये खुप राग होता.

त्याला प्रल्हाद नावाचा मुलगा झाला होता. पण प्रल्हाद बालपणापासून  श्री विष्णूचा कटर होता. प्रल्हाद सकाळ संद्याकाळ श्री विष्णूचा जप करीत असे. नेमके हेच हिरण्यकश्यपूला आवडत नसे. असे करत त्याच्यामुळे त्याने प्रल्हादाला श्री विष्णूचा पासून लांब दूर करण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रत्येकवेळी तो निराश अयशस्वी होत असे. क्रोधामुळे कंटाळून हिरण्यकश्यपूने आपल्याच मुलाला मृत्यु दंड देण्याच निछय केला. अशा कामा मध्ये  त्याने आपल्या सख्या बहिणीची मदत घेण्याचा निर्णय  घेतल.  तिला सगळे होलिका ह्या नावानेच ओळखत ती राक्षसीप्रवृत्तीची असल्यामुळे 

एकदम राक्षसीप्रवृत्तीची आणि क्रूर होती. तिला अग्नी पासून भिती नसल्या मुळे आणि अग्नीपासून  त्रास होत नसे म्हणून हिरण्यकश्यपूने 

लाकडाची चिता तयार करण्यास सांगितली. त्यावर होलिकेला  बसन्यास सांगितले. आणि मग तिच्या मांडीवर प्रल्हादाला बसविन्यात आले. परंतु, प्रल्हादाच्या भक्तिमुळे सगळे उलटे झाले. होलिका ही अग्नीत जळून नाश झाली. आणि  श्री विष्णूभक्त असल्यामुळे प्रल्हादाला काहीही एक झाले नाही.प्रल्हादाच्या भक्तीने प्रसन्न होऊन श्री विष्णूने खांबातून नृसिंह अवतारात हिरण्यकश्यपूचा सर्वनाश केला.
 
होलिका वाईट प्रवृत्तीची  होती तिचा अंतही जळून म्हणजेच वाईट पद्धतीने झाला. आपल्या मनातील राग तिरस्कार  वाईट आचार विचार हे होळीमध्येव सोडून देऊन ताची राख करावी हा होळी पेटवण्या मागचा उद्देश आहे. या दिवशी वाईट विचाराच्या गोष्टींचा नाश करून चांगल्या गोष्टींचा विचार करावे त्यामुळे आपले संपूर्ण आयुष्य वर्ष सुख-समाधानाचे जाईल. 

होलिकेचा जळून अंत झाला तो दिवस फाल्गुन शुद्ध पौर्णिमा असल्याने दरवर्षी त्यादिवशी होळी उत्सव मोठ्या प्रमानात व  उत्साहाने साजरा केला जातो. 

महाराष्ट्रात देखील जवळ जवळ सर्वच ठिकाणी  होळी हा सण आंनदाने, उत्साहाने साजरा केला जातो. आदल्या दिवसापासूनच होळीसाठी लाकडे, झाडाच्या फांद्या गवत,गवरी आशा वस्तु जमाकेल्या जातात. काही ठिकाणी ही लाकडे चोरूनही आणली जातात. तर काही ठिकाणी उंबराचे, आंब्याचे असे वेगवेगळ्या झाडांचे खांब त्यावर रंगबिरंगी कपड्याचे तुकडे बांधले जातात.

सर्वजण झाडाच्या त्या फांदीला कापडाचा एक तुकडा बांधतात. ती फांदी कपड्यांच्या तुकड्यांनी पूर्णपणे झाकली जाते, नंतर तिला सार्वजनिक ठिकाणी गाडले जाते. फांदीला पुऱ्या अडकवल्या जातात  त्याच्यावर गवत, वाळलेली लाकडे, गवर्‍या, केळी, इतर फळे असे एकावर एक ठेऊन रचले जातात. शुभ मुहूर्तावर होळीचे पूजन करून मुख्यत: पुरणपोळीचा नैवैद्य दाखवीतात. नंतर होळीचे दहन करण्यास सुरवात केले जाते. दहन करताना 'होळी रे होळी पुरणाची पोळी.. असे मोठयाने बोले जाते. आणि नंतर  गाणे लावून भजन करून नाचून होळी जागवली जाते असा हा सन मोठया उत्सवाने साजरा केला जातो. 


आमचा पुढील ब्लॉग  -  Click   कैलास पर्वत कोणालाच सर करता आला नाही महित आहे का ?

माज्या ब्लॉग मधील माहिती तुमच्या पर्यत पोहचवण्याचे उदेश आहे. तुमला हा लेख कसा वाटला कमेंट मधुन जरूर कळवा तुमचा आपला MAP ART HISTORY धन्यवाद 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: