आपल्या मुलीमध्ये सर्व बौद्धिक विकास गुण पाहीजे असतील तर आपण तिला काही गोष्टी शिकवायला पाहिजे.
मुलीमध्ये सर्व गुण पाहीजे असतील तर काही गोष्टी खाली नमूद केल्या आहेत त्या तुमी करु शकता. मुलीला कशात जास्त गोडी आहे तिला समजून घ्या तिचे मन ओळखा तीचीआवड बघा काय आहे. तिचा कल ज्या बाजूने जाईल त्या गोष्टी ध्यानात घ्या,
म्हणायचा मुद्दा असा की तिला कले मधे रुची आहे की खेळात रुची आहे की विज्ञानाचे वेड आहे.
तिच्या आवडीनुसार तिला चांगल्या मार्गदर्शकांचे क्लास लावा. तिच्या आवडत्या विषयामध्ये तुम्हीपण आवड घ्या जेणेकरून तिच्या प्रगती चा आढावा घेता येईल. हे सर्व करत असताना तिला अभ्यास पण महत्वाचा आहे हे पटवून द्या. चांगले पुस्तक वाचन शिकवा. चांगले चित्रपट आणि नाटक दाखवा.
वाचण्यात गोडी नसेल तर ऑडियो बूक मधून तिला छान गोष्टी ऐकवा जेणेकरून तिची वाचनात गोडी निर्माण होईल.
तिचं प्रवाहाविरुद्ध स्वप्न असेल तर ते तिचं आकलन बघुन तुम्ही त्याला वाव द्या. तिला अजुन साधन पुरवायला तिची मदत करा. पण एक गोष्ट तिला आवर्जून सांगा, ह्या स्पर्धेच्या युगात आपण अपयशी होऊ शकतो पण त्याने खचून न जाता, त्याहून सोपा मार्ग आपल्या हाताशी असू द्यावा. जेणेकरून हाताशी काही राहिलं पाहिजे. (उदा. तिला धावपटू व्हायचं असेल तर तिला ते करायला. प्रोत्साहन द्या, पण नशिबाने तिला ते काही कारणामुळे नाही जमलं तर बॅकअप मधे दुसरा करिअर ऑप्शन ठेवायची जबाबदारी घ्या, सहसा साधारण गुण जरी असले तर समोर चांगली डिग्री आणि नोकरी करता येते) फक्त अभ्यासच करायला जोर नका देऊ. तिला एक कुठलीपन कला आणि खेळ चांगल्याप्रकारे आला पाहिजे असा हट्ट ठेवा.
तिला जनसंपर्क बनवायचं लहानपणापासूनच शिकवा. कोणाचेही मन न दुखवता संवाद करायची कला शिकवा.
तिला मुलींबरोबर मुलांशी सुध्दा मैत्री करू द्या. यामागे कारण एकच की तिला मुलांचा दृष्टिकोन मुलींपेक्षा किती वेगळा असतो आणि त्यांचे चांगले गुण आपण कसे अवगत करू शकतो याची जाणीव होईल. तसेच पुढे जाऊन मोठी झाल्यावर तिला पुरुषांमध्ये करिअर घडवायचं आहे, लग्न करायचं आहे...तेव्हा तिला मुलांच्या मानसिकतेचा अंदाज आला असेल आणि ती योग्य जोडीदार निवड करू शकेल. करिअर मध्ये पुरुषांची संख्या जास्त बघुन आपण मागे तर नाही पडू हा न्यूनगंड राहणार नाही.
तिच्या मित्र मैत्रिणींचा आढावा घ्या, कारण घरच्यांपेक्षा जास्त ती त्यांच्यामध्ये असेल
(शाळेत, खेळताना, ई.) तेव्हा ती कोणाच निरीक्षण करेल ही जबाबदारी तुमचीच आहे.तिला सगळे लोक समान आहेत हे लहानपणापासूनच तिच्या मनावर बिंबवत रहा. कोणाची जात, धर्म, लिंग, आर्थिक स्थिती, सेक्शुअल प्रेफरन्स ह्या गोष्टवरून भेदभाव न करण्याचे प्रोत्साहन द्या. कोणतेच काम छोटे मोठे नसते, त्यामुळे कुठलीही व्यक्ती आपले पोट भरण्यासाठी ते करत असते, त्यामुळे एखाद्या झाडू मारणाऱ्या कर्मचारी कडे बोट दाखवून तिला कधीच हा सल्ला नका देऊ की मेहनत नाही केली तर अशी बन शील. याने तिची विवेक ता लहानपणीच कमी होईल.
तिला व्यवस्थापनाचे धडे द्या. सगळ्या गोष्टी करताना नीटनेटकेपणा कसा ठेवायचा याचे शिक्षण द्या.
तिला योगाभ्यास, ध्यान करायचे शिकवा. तिला याचे महत्व कळू द्या.
तिला तिचे मत मांडण्याची पद्धत शिकवा, आणि घरात तिचे मत ऐकून त्यावर गरज असल्यास तुमचा सल्ला द्या.
चुकीच्या गोष्टीला चूक म्हणायला आणि बरोबर गोष्टीला प्रोत्साहन द्यायचे शिकवा.
कोणाचेही आपल्याबद्दल चुकीचे मत ऐकल्यानंतर स्वतःचे खच्चीकरण नं होऊ द्यायचे तिला सांगा.
तिच्या यशामध्ये आनंद साजरी केल्यानंतर तिला जाणीव करून द्या की हे यश तात्पुरतं आहे, तिला तिच्या आनंदावर मात करून तटस्थ राहायचा सल्ला द्या. हे खूप महत्वाचं आहे, मूल आपल्या यशाने हुरळून जातात आणि त्यांना गर्व व्हायला कोवळ वय प्रोत्साहन देत असत. परिणामी नवीन गोष्टी शिकायला त्यांना मजा येत नाही, करणं आपल्याला सगळ येत असच त्यांना त्यांचा यशामुळ भ्रम होतो.
जसं यश, तसचं अपयश अपयश आल्यावर खचून न जाता अजुन मेहनत करायला तुम्हीच प्रोत्साहन दिलं पाहिजे.
तिला जाणीव करून द्या ती या जगात एकटीच गुणी नाही आहे, तिच्यापेक्षा जास्त गुणवंत लोक आजूबाजूला आहे तेव्हा नेहमीच स्वतःचे स्किल वाढवायला तिला सांगा.
तिचे मित्र बनून तिच्या सोबत नेहमीच तिच्या गुणांमध्ये भर करा, चुकत असल्यावर नक्की रागवा, चूक कशी बरोबर करता येईल हे सांगा. तिने तुमच्याकडे मन मोकळं करावं अशी वागणूक ठेवा. तिला तुमचा आदरापेक्षा आधार वाटू द्या.
आयुष्य जगताना ज्यापण छोट्या मोठ्या गोष्टी लागतात त्या आपण मुलींना शिक वतोच जसं की स्वैंपाक, घर आवरण, साफ सफाई ई. पण तिला हे करण्यामागे स्वावलंबी बनवायला ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत हे पटवून द्या. (सहसा घरी हेच म्हणून शिकवल्या जाते की सासरी गेल्यावर काय करशील, माझ्या मते हा दृष्टिकोन चूक आहे.)
तिला तिचे निर्णय स्वतः घेताना कोणती काळजी घ्यावी हे तुमच्या अनुभवा वरून सांगा. आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ द्या. (म्हणजे नक्कीच ती मोठी झाल्यावर वय: १६ नंतर)
तुम्ही घरी वादाचे वातावरण टाळा, मूल हे तुमचं वागणं निरीक्षण करूनच शिकत असतात.
तिला तिच्या बालवयात ती जे जे शिकू शकेल ते शिकायला प्रोत्साहन द्या, कारण मोठं झाल्यावर अजुन मोठं व्हायला लागणारा पाया हा तर बालपणीच बांधला असतो.
मला लहानपणापासून संगीत क्षेत्राची आवड होती. तसचं स्केटिंग, स्विमिंग बघुन जाम मज्जा यायची आणि हे सगळ मी दुरूनच बघायची आणि मी यामध्ये अव्वल असेल असं मनात निर्णय करायची, माझ्या आईवडलाना मी खूप पटवायची की मी हे का केलं पाहिजे. माझ्या आई वडिलांचा कल हा फक्त आणि फक्त अभ्यासावर होता, आणि मी नेहमीच वर्गात अभ्यासात हुशार त्यांच्यामुळेच होती यात वाद नाही, पण मनात थोडी खंत असते की तेव्हा मला संगीत शिकू दिलं असत तर आज मी ९-६ जॉब च्या ऐवजी संगीत क्षेत्रात नक्कीच पाय रोवले असते. कुठल्याही मार्गदर्शन नं मिळता मी जितकं स्वतःहून निरीक्षण करून शिकली आहे, तेच माझा छंद म्हणून जपत आहे.
हे सगळ सांगण्या मागे एकच हेतू आहे की तुमच्या हातात तिचं भविष्य आहे तिला फक्त अभ्यासामागे नका लावू, तिला आकार द्या, बळ द्या आणि उंच भरारी घेताना बघा. मला खात्री आहे, ती नक्कीच कल्पना चावला, श्रेया घोषाल, सायना नेहवाल सारख्या महान स्त्रियांच्या यादीत स्वतःच नाव नोंदवण्याची क्षमता ठेवते.
ही माझी भाची आहे, पुर्ण वेळ तर तिच्यासोबत नाही राहता येत, पण जेव्हा जेव्हा मला जमत, तेव्हा तेव्हा मी वरील बाबी तिच्यासोबत लागू करायचा प्रयत्न करते.
आमचे पुढील विषय:-
१ - ग्रीन टी, हिरवी चहा काय आहे आरोग्यासाठी किती उपयोगी आहे?
२ - हे उपाय करून नेहमी तरुण राहता येते?
३ - सुटलेले पोट कमी करण्यासाठी काय काय करायला पाहिजे?
४ - पहाटेची सकाळची ताकत किती असते ?
आमचा पुढील ब्लॉग - Click - सुटलेले पोट कमी करण्यासाठी काय काय करायला पाहिजे?
माज्या ब्लॉग मधील माहिती तुमच्या पर्यत पोहचवण्याचे उदेश आहे. तुमला हा लेख कसा वाटला कमेंट मधुन जरूर कळवा तुमचा आपला MAP ART HISTORY धन्यवाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा