महाराष्ट्रातील आदीवासी समाज व त्यांच्या परंपरा
भारतात अनेक प्रकारच्या जाती आहेत आणि त्यांच्या अनेक परंपरा आहेत असे बोलले जाते आदिवासी समाज भारताचा मूळ नागरिक आहे आज आपण आदिवासी समाजाबद्दल बघूया त्यांची परंपरा विषय गंभीर आहे कारण आपण ज्या आदिवासी समजा समाजाला ओळखतो तो आदिवासी समाज अजूनही त्याच तर स्थितीमध्ये आढळून येतो असे का?
भारतात अनेक प्रकारच्या जाती आहेत आणि त्यांच्या अनेक परंपरा आहेत असे बोलले जाते आदिवासी समाज भारताचा मूळ नागरिक आहे आज आपण आदिवासी समाजाबद्दल बघूया त्यांची परंपरा विषय गंभीर आहे कारण आपण ज्या आदिवासी समजा समाजाला ओळखतो तो आदिवासी समाज अजूनही त्याच तर स्थितीमध्ये आढळून येतो असे का?
- कोण आहेत फेसबुक चे मालक कसा चालू झाला? प्रवास
- या युद्धात ८० हजार महिलांवर बलात्कार करण्यात आला.
- मांजर सेनेचा युद्धासाठी वापर वाचले आहे का?
- श्री गणेशाचे जे तोंड उडवले त्या तोंडाचे काय झाले ?
- सर्वात जास्त लोक दुबईला पसंती देण्याचे कारण काय?
- महाराष्ट्रातील सर्वात मोठे झाड कुठे आहे?
- ऑस्ट्रेलियाचा हा इतिहास माहित आहे का ?
खाडी किनार्यालगत राहणार्या काहीच समाजाला आपण सुधारलेला पाहतो,
कारण आजूबाजूचा परिसर डेव्हलप होत चलला आहे, आणि शहरीकरण होत चलला आहे. त्यामुळे एथे राहणाऱ्या वस्त्या थोड्या फार प्रमाणात बदल्या आहेत. पण अजुन अश्या कित्येक आदिवासी जाती आहेत, ज्या आजही डोंगरकुशीत आपले आयुष्य जगत आहेत.
त्यामध्ये महादेव कोळी, ठाकर, कातकरी, कातवडी, असे अनेक आदिवासी जाती आहेत, की त्या जंगलामध्ये आपल्या समाजातील हजारो वर्षाच्या परंपरा जपत आहेत, आपले कठीण जीवन जगत आहेत, राहण्यासाठी पक्का घरे नाही, त्यांच्या नशीब अजूनही बांबू ,कारवी, यांच्या पासून बनवलेली घरे आहेत, आणि त्यांना सेना मातीने सारवतात, घराचे छप्पर हे रानातील गवतांनी झाकलेले असते, आणि घराच्या मागच्या बाजूला पावसाळ्यामध्ये काकडी भोपळा डांगर दोडका असे खाण्याच्या भाज्या लावलेल्या असतात.
या आदीवासी समाजाच्या घराच्या भिंती बांबूच्या काड्यांनी बनवलेली असते, व मध्येमध्ये कारव्याचे कुंपण करून ही भिंत तयार केलेली असते, बाजूला घरातच जमिनी मध्ये रोवलेल्या खुंट्या असतात, या खून त्यांना जनावरे बांधली जातात, कोपऱ्यामध्ये कोंबड्यांसाठी एक खुराडा असतो,अश्या प्रकारचे राहणीमान या समाजामध्ये पहायला मिळते.
तसे बघायला गेल्यावर ठाणे, नाशिक अहमदनगर अशा जिल्ह्यांमध्ये घनदाट जंगल आणि डोंगरदर्या पहावयास मिळतील, आदिवासी समाजाबद्दल अजून बोलायचे झाले तर ठाणे, जव्हार, नाशिक या ठिकाणी अनेक अविभाज्य भाग आहे, त्यात शहापूर, मुरबाड, तलासरी, जव्हार, मोखाडा, पालघर, डहानु, वाडा, भिवंडी, असे अनेक गावे आहेत. या सर्व भागांमध्ये आदिवाशांची रहदारी अस्तित्वात आहे.
आदीवासी समाजमधील काही आदीवासी जाती त्यात महादेव कोळी, वारली,ठाकर,कोकणा, भिल्ल, कातकरी, या अश्या जाती आहेत आणि त्या हजारो म्हणजे आदिम काळापासून याठिकाणी वास्तव्याला आहेत. आणि हा समाज याचठिकाणी रहिवासलेले आहेत, आणि प्रत्येक समाजाची एक वेगळी ओळख आहे. आदिवासी समाजाची नृत्य, कला त्यांचे संगीत जगात कुठेच ऐकायला मिळत नाही. आदिवासी समाजातील चित्रकलेला जागतिक पातळीवर सन्मान आहे. आदिवासी समाजातील कलाकौशल्य दाग दागिने, पेहराव, वेशभूषा, नृत्य, संगीत, आणि कोरीवकाम केलेल्या वस्तू, त्यात लाकूड, धातु, देवदेवतांच्या मूर्ती, ज्यांनी बांधकाम करतात अशा वस्तू, शिकारीसाठी चे आयोध्या हत्यारे, जाळी व भिंतीवरील चित्रकला या वस्तूंचा सहभाग आहे.
आदिवासी समाजाची चित्र काढण्याची परंपरा खूप पुरातन काळापासून आहे.
गुहेत राहणारा आदिवासी समाजाचे पूर्वज हे पुरातन काळापासूनच चित्र काम करत असत, ते गुहेमध्ये वेगवेगळी उभ्या-आडव्या रेषा काढून चित्रकला करत, संपूर्ण चित्रकलेचं ज्ञान झाल्या नंतर मग ते प्राणी आणि वनस्पती असे चित्र काढू लागले, आणि बरीचशी चित्रे गुहेमध्ये काढली जाऊ लागली, जेव्हा डॉक्टर वि. श्री वाकणकरांनी प्रागैतिहासिक गुहा चा शोध हा मध्य प्रदेशामध्ये लावला, त्यात मिर्झापूर, भिंबेटका, पंत, मंडी, भोजपुरी अशा अनेक ठिकाणी आदिमानवाच्या चित्रकलेचा शोध लावला गेला इ. स. सन २०००० ते १२००० वर्षाच्या मागचे आहे.
आधी मानवांच्या भिंती चित्राचा एक वेगळाच जुना इतिहास आहे.
तो म्हणजे ह्या आदिवासी समाजाने आपली ही बहुमूल्य कला आपल्या घरांमध्ये आणून पोचवली आहे. आदिवासी समाजातील स्त्रिया आजही आपल्या घरामध्ये भिंतीवर अंगणात सारवून चित्र काम करताना आढळतात. त्यामध्ये काटकोन, त्रिकोण, पशु, पक्षी,प्राणी श्री, पुरुष, डोंगर पाणी, फुले, शेत, निसर्ग, आणि देवता अशा अनेक चित्रांचा समावेश होतो.
आदिवासी समाजाच्या देवांना आकार नाही
हो आदिवासी समाजाच्या देवांना आकार नाही ते हा समाज निसर्ग पूजक आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार निसर्गात काय ते आहे, निसर्गातच आपली आत्मा जडलेली आहे, आदिवासी समाजामध्ये रहस्यमयी मंदिरे आढळतात आदिवासी समाज निसर्गपूजक असल्यामुळे निसर्गातील वड, पिंपळ, आंबा, सूर्य-चंद्र, शेत, अशा अनेक रूपात तो देवपूजा करतात, आदिवासी समाजातील देवांना आकार जरीही नसला तरीही ते अद्भुत चमत्कार यांना देव म्हणून ते पूजा करतात,
आदिवासी समाजामधील देव हे वेगवेगळे आहेत जसे.......
भिल्ल समाजाचा - ईल देव
वारली समाजाचा - नारायण देव
कोकणा समाजाचा - शिवाया
ठाकर समाजाचा - चव्हाटा
अशा देवांना आकार नाही त्यात बैलदेव हा निसर्ग निर्मित विशिष्ट आकार मिळालेला देवाचे प्रतीक आहेआदिवासी समाजामध्ये आईची म्हणजेच देवीची की पूजा ही खूप महत्त्वाची मानली जाते. त्यात
महालक्ष्मी - डहाणू
सप्तश्रुंगी - वनी
रेणुका माता - माहूर
अंबामाता - यवतमाळ
भवानी माता - चंद्रपूर
महादेव कोळी समाजाची - वर्सूआई
महाभोगी (मोगरादेवी) - भिल्ल समाज,
ही सर्व देवीची रूपे व ठिकाणे आहेत. आणि हे सर्व आदिवासी भागांमध्ये आहेत.
आदिवासी स्त्रिया हजारो वर्षांपासून आपल्या संस्कृतीचे धार्मिक धार्मिक विचारांनी कल्पनांनी भिंतीवर सणावाराच्या दिवशी चित्र रेखाटतात, त्यात निसर्ग, शेती, विहीर, झाडे, घरे, डोंगर, दर्या, नृत्य, कला, चंद्र, सूर्य, अशा विविध विषय घेऊन रंगरंगोटी केली जाते. जर आपण वारली समाजाचा विचारलेला तर, हा समाज आज एक सर्वात चर्चित समाज आहे. वारली चित्रकला आणि पेंटिंग ही ठाणे जिल्ह्यामध्ये या समाजाने बहुमूल्य जपलेली आहेत.
ही कला आजही जिवंत ठेवण्याच्या मागे वारली स्त्रिया, पुरुष यांचा मोठा वाटा आहे, या समाजामध्ये भगत हा त्यांचा मार्गदर्शक असतो, त्याच्या हटामुळेच ह्या कला खरे तर जिवंत राहू शकल्या आहेत. आज वारली चित्रकला म्हणून मोठ्या मानाने पाहिले जाते. ते फक्त आणि फक्त पद्मश्री जीवा सोमा म्हसे आपल्या नाही आज त्यांच्यामुळे आदिवासी चित्रकला सातासमुद्रापार गेली आहे आणि आदिवासी यांच्या चित्रकलेला मोठा मान मिळवून दिला आहे आदिवासी आपली संस्कृती अशीच पुढे जपत राहो.
आणखी वाचा रोचक इतिहास
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा