Hot Widget

Breaking

सोमवार, ३ मे, २०२१

नवनाथ महाराजांची माहिती कदाचित तुमाला माहित नसेल? I You may not know about Navnath Maharaj?

नवनाथ महाराजांची माहिती कदाचित तुमाला माहित नसेल?

नवनाथ महाराजांची माहिती कदाचित तुमाला माहित नसेल? पण ज्यांनी ग्रथांचे वाचन केले असेल त्यांना सांगायला नको नाथ महाराज कोण होते, आणि कश्या पद्धतीने त्यांनी शबरी विद्या आजमावली 



नाथांच्या भक्तीने भारावलेला भक्त नाथांच्या दर्शनासाठी वेडापिसा होतो तत्वज्ञाना साठी वणवण भटकतो ,कारण तत्त्वज्ञानात गुढ आहे. जन्म मृत्यु रहस्याचे ! ते जसे दुर्गम वाटते तसेच विश्वाच्या उत्पत्तीचे गुढच आहे. महादेवीने गोरक्षनाथाना विश्वनिर्मितीचे गुढ विचारले होते. कारण गोरक्षनाथ हे एक नाथ पंथीय योगी होते. व त्यांच्या तोंडुन हे गुढ उकललेले ऐकावे असा मानस महादेवीचा होता. परंतु गोरक्षनाथानीही महादेवीला सांगीतले की आनंदमय महादेवाने विश्वाची स्वयमनिर्मीती केली. त्या आदिदेव आदीनाथापासुन ईछाशक्ती निर्माण झाली व त्यातूनच क्रिया शक्ती निर्माण झाली पुढे त्यातुनच जगाची उत्पत्ती झाली. जगात उत्पत्तीचा अध्यात्मिक इतिहास अशा तर्हेने श्री गोरक्षनाथानी गोरक्ष उपनिशदात सांगीतला. तो तर्कशुद्ध आहे. जीवशिवाच्या भेटीची ओढ लागलेला जीव विचारांती श्री गोरक्षनाथांच्या तर्कशुद्ध विवेचनाचाच विचार गंभीरपणे करु लागतो व हळूहळू त्याच्या तर्कशुद्धतेचा अभ्यास करुन मानवाच्या निर्मीतीतुन ईश्वरभक्तीचा भास अभास - उदय - अंत ,लय - विलय ,प्रकाश - अंधार ,पृथ्वी- आकाश, देव - दानव स्थितीचा वेध घेत असतो या वैचारिक वेधातुनच ईश्वरनिर्मीतीची कल्पना उगम पावते व मानवी मन भक्तीकडे वळते.

नाथपंथाची ओळख शाबरी विेद्येच्या माहितीशिवाय अपुरीच राहील. 

नाथपंथाचे नुसते नाव काढले तरी शाबरी विद्येची आठवण होते. किंबहुना काही लोक या शाबरी विद्येमुळेच नाथपंथाकडे आकर्षित होतात! खरे तर नाथांनी त्यांच्या काळात जीवब्रह्म सेवेसाठी या विद्येचा उपयोग केला. परंतु आज मात्र ही विद्या बर्‍याच प्रमाणात लुप्त झाल्याचे दिसते. फक्त काही बोटावर मोजण्याइतक्या नाथपंथीय योग्यांजवळ ती टिकून आहे.


गुरु गोरक्षनाथांनी या विद्येचा उपयोग सर्वसामान्यांची दुःखे दूर करण्यासाठीच केला. 

परंतु ही विद्या म्हणजेच सर्वस्व नव्हे किंवा ते नाथयोग्यांचे अंतिम साध्यही नव्हे असे त्यांनी निक्षून सांगितले आहे. ही मंत्रविद्या म्हणजे 'क्षुद्रसिद्धी' आहे असे ते म्हणतात. जीवशिवऐक्य हेच या पंथाचे अंतिम उद्दिष्ट आहे.

शाबरी विद्येतील मंत्राची माहिती पाहण्यापूर्वी या विद्येला 'शाबरी' हे नाव का पडले याची थोडीशी माहिती करून घेणे आवश्यक आहे.

त्यासाठी एका पौराणिक कथेची ओळख आपल्याला करून घ्यावी लागेल. ती कथा अशी... 

एकदा भगवान शिव ध्यानावस्थेतून जागृत झाले तेव्हा त्यांना समोर गौरीचे (पार्वती) दर्शन झाले. त्यावेळी शिवांवर आकृष्ट होऊन गौरीने त्यांची अर्धांगी होण्याची इच्छा प्रकट केली. अन्‌ शिवांनी या गोष्टीला तत्काल मान्यता दिली आणि शिवशंभू संसारी झाले!

आदिनाथ आणि आदिमाया यांचे मंगल मीलन झाले!

परंतु संसार म्हटला की पति-पत्नींचे वाद-विवाद हे आलेच! शिव आणि गौरी यांचेही असेच वादविवाद होऊ लागले आणि रागाच्या भरात शिव कैलास सोडून एका निबिड जंगलात एकांतात येऊन राहिले अन्‌ त्यांनी तिथेच समाधी लावली. गौरीनं-म्हणजेच पार्वतीनं त्यांचा खूप शोध घेतला. पण छे! ते कुठले सापडतात ! तेवढ्यात नारदमुनी अचानक तिथे आले. गौरीनं आपली व्यथा त्यांना ऐकवली. नारदमुनींनी अंतर्ज्ञानाने शिवांचा शोध घेतला अन्‌ त्यांचे बसण्याचे ठिकाण देवी पार्वतीला सांगितले. तेव्हा पार्वती त्या ठिकाणी हजर झाली अन्‌ तिथे भिल्लीणीचा वेष घेऊन भगवान्‌ शिवांसमोर संगीतप्रधान नृत्याला सुरूवात केली.

त्या आवाजाने शिवांची समाधि उतरली नि ते समोर पाहतात तो शाबरी वेशात असलेली मूर्तिमंत सौंदर्याने न्हालेली गौरी! तेव्हा शिवांनी स्मितहास्य करीत तिला विचारलं, 'शबरी, तू मला माझ्या दिव्य समाधीतून जागृत का केलंस?' त्यावर शबरी म्हणाली, 'प्रभो, मला आपणाकडून एका गोष्टीचं मर्म जाणून घ्यायचं होतं.'

शिव  : 'कोणती गोष्ट?'

शबरी : 'आपली ही समाधी!'

शिव : 'समाधी?'

शबरी : 'होय, आपण वर्षभर मला सोडून या अवस्थेत कसे राहिलात? सांगाल मला?'

शिव :'अं, सांगेन. पण इथे आत्ता नाही. पुन्हा केव्हातरी.'

शबरी : 'कधी? आणि कुठे?'

शिव : 'अशा ठिकाणी की जिथे मानवाची वस्ती नसेल, ते रहस्य कुणी ऐकणार नाही अशा ठिकाणी.'

पुढे तो विषय तेवढ्यावरच राहिला. नंतर शिवपार्वती दोघेही पुन्हा कैलास पर्वतावर गेले.

काही दिवसांनी गौरीनं त्या गोष्टीची शिवांना आठवण करून दिली. तेव्हा शिव तिला घेऊन एका निबिड जंगलातील नदीकिनारी आले व ते समाधीचे गूढ तिला शाबरी भाषेत सांगू लागले. कारण शाबरी हीच गौरीची मातृभाषा होती. (गौरी ही भिल्लकन्या होती.)

परंतु ते शाबरी भाषेत सांगितलेले गूढ मत्स्यीच्या पोटात असलेल्या मच्छिंद्रनाथांनी ऐकले! ही गोष्ट शिवांनी अंतर्ज्ञानाने जाणली व मच्छिंद्रनाथांना आशीर्वाद देऊन त्यांनी त्यांना हठयोगाचा उपदेश केला व जीवब्रह्माची सेवा करण्यास सांगितले. भगवान शंकरांनी गौरीला सांगितलेली ही शाबरी विद्या आणि त्यातील मंत्र हे शाबरी भाषेत असल्याने नाथपंथात ती 'शाबरी विद्या' म्हणूनच प्रसिद्धीस आली.

मच्छिंद्र, जालंधर यांच्याप्रमाणेच ही विद्या गोरक्ष व कानिफ यांनीही जीवब्रह्मसेवेसाठीच उपयोगात आणली.

शाबरी मंत्र व वैदिक मंत्र

शाबरी आणि वैदिक मंत्रात बराच फरक आहे. कारण वैदिक मंत्र हे प्रथम तपश्चर्येने सिद्ध करावे लागतात. परंतु शाबरी मंत्र हे स्वयंसिद्धच आहेत. कारण ती 'ईश्वरी वाचा' आहे. तसेच, त्यांच्यामागे नाथसिद्धांची तपस्या आहे. म्हणूनच श्रीगोरक्षनाथांना तपोबल प्राप्त झालेले नसतानाही मच्छिंद्रनाथांनी दिलेल्या संजीवनी मंत्राने त्यांनी मातीच्या पुतळ्याला सजीव केले. हा गोरक्षांच्या मंत्राचा प्रभाव नसून म च्छिंद्रनाथांच्या तपोबलाचा, गुरुअधिष्ठानाचा प्रभाव आहे हे विसरता कामा नये.


आणखी वाचा रोचक इतिहास 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: